केज तालुक्यात एकाची गळफास घेवून आत्महत्या.

केज दि.8 अॉगस्ट – केज (Kaij) तालुक्यातील गांजी शिवारात एका 65 वर्षीय वृध्द इसमाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून युसुफ वडगाव पोलीसांत (Police) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
(One commits suicide by hanging in Kaij taluka.)
गांजी येथील उत्तम बाबुराव जाधव यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला मोतीराम चंद्रभान पटने यांनी दि.8 ऑगस्ट रोजी सकाळी 7.15 च्या सुमारास आत्महत्या (suicide) केल्याचे निदर्शनास आले. सदरील व्यक्तीला दारूचे व्यसन होते. यातूनच त्याने आत्महत्या केल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलिस ठाण्याचे बिट अंमलदार परमेश्वर शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मयताच्या पुतण्याच्या खबरेवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास शिंदे हे करत आहेत.