राजपाल काकडे यांची गरजवंतांना मदतीचा हात

केज दि.८ (प्रतिनिधी) तालुक्यातील बनसारोळा येथील राजकिय आणि सामाजिक क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व राजपाल काकडे यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत दि.८ जून रोजी गरजवतांना मदत वाटप केली.

कोरोना संकटाच्या काळात अनेकांना हाताला काम नसल्याने अडचणीची वेळ आली. अशा परिस्थितीत   बनसारोळा येथे साई महिला पतसंस्थेच्या माध्यमातून साई सहायता निधी मधून गरजूवंत लोकांना (किट) किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. साईकडून मिळालेल्या मदतीमुळे गरजवंताच्या चेहऱ्यावर समाधान दिसुन आले. यावेळी राजपाल भैय्या काकडे, प्रदीप पालकर, पांडुरंग गायकवाड, अमोल गायकवाड, शशिकांत कांबळे, बाळासाहेब वसंत काकडे, अनिल गोरमाळी रमेश पुजारी, राम वाघमोडे ज्ञानेश्वर गोरे, बबन जोगदंड, धीवर दादा , निजाम सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!