राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने हॕन्ड सॕनिटायझर मशिनचे वाटप

किल्लेधारूर दि.१(वार्ताहर) राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने हॕन्ड सॕनिटायझर मशिनचे धारुर, बीड व वडवणी तालुक्यात लोकांच्या सेवेसाठी अनेक ठिकाणी मोफत वाटप करण्यात आले.

राजमुद्रा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर पिंगळे, संघटनेचे मार्गदर्शक सुरेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेकडून कोरोना काळात लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. वडवणी या ठिकाणी जागृती मल्टीस्टेट व सोमनाथ हॉटेल व धारूर येथील बस स्थानक, विके मोटर्स तसेच बीड येथील धनलक्ष्मी अर्बन बँकेत हॅन्ड सॅनिटायझर मशीनचे लोकार्पण सोहळा घेण्यात आला. या वेळी सोमनाथ हॉटेलचे मालक नगरसेवक शेषराव जगताप, माजी शिवसेना ता. प्रमुख. विनायक मुळे, धन लक्ष्मी चे चेयरमन अंबादास सपकाळ, सतिश सपकाळ, राजमुद्रा सामाजिक संघटनेचे वाहतुक शाखेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब लोखंडे व युवक बिड जिल्हा अध्यक्ष बबलू सावंत, धारूर तालुकाध्यक्ष उमेश पवार, वडवणी युवा सेना शहर प्रमुख भैय्यासाहेब खोसे, पुसरा चे सरपंच हरिभाऊ पवार, सुग्रीव मुंडे, भैय्यासाहेब वाघमोडे, पवार, वडवणी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बाबुराव जेधे, भैय्यासाहेब तांगड, ज्येष्ठ पत्रकार सदानंद खिडरे, जागृती बँकेचे कर्मचारी उपस्थित होते. राजमुद्रा संघटनेकडून घेण्यात येत असलेल्या उपक्रमाचे कौतूक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!