रोटरी क्लबच्या वतीने मेडिकल किटचे वाटप 

सहाशे नागरिकांना दिले मोफत किट

किल्लेधारूर दि.२२(वार्ताहर)  कोरोना विषाणू संसर्गाची लागण देशभरात झाली असल्याने सर्वत्र लाॅकडाऊन केले आहे. या विषाणूंचा फैलाव होऊ नये यासाठी किल्ले धारूर रोटरी क्लबच्या वतीने आज शहरातील गोरगरीब व गरजूवंत लोकांना घरपोच मेडिकल किट ज्यात १ मास्क, १ सॕनिटायजर, १ साबण आणि १ हँडवास पाॅकिट असे ६०० किट तयार करून वाटप करण्यात आली आहेत.

सध्या जगभर कोरोना या महाभयंकर व्हायरसने थैमान घातलेले आहे. भारतातही या महामारीत २० हजारापेक्षा जास्त रुग्ण मिळाली आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादूर्भाव दिसुन येत आहे. या महामारीस रोखण्यासाठी घरात बंदिस्त राहणे, हात स्वच्छ धूणे, सतत सॕनिटायझर वापरणे अशी उपाय सांगण्यात आलेली आहेत. सध्या लोकांनी घरा बाहेर पडू नये म्हणून संपुर्ण देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेले आहे. या लॉकडाऊन  काळात अनेकांच्या उपासमारीचा प्रश्न निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात दात्याने जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. मात्र या रोगाचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या औषधी वस्तूंचे वाटप रोटरी क्लब किल्लेधारूर  यांच्या वतीने   आज अशोकनगर पासून सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमास तहसिलदार व्हि. एस. शिडोळकर, पोलिस निरीक्षक सुरेखा धस, नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी, मुख्याधिकारी सुहास हजारे, ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.चेतन आदमाने, नायब तहसिलदार विटेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी किल्ले धारूर रोटरी क्लबचे रोटरी अध्यक्ष अमोल गुळवे, सचिव विजयसिंह दिख्खत, आनंद पिलाजी, माजी अध्यक्ष अनिल चिद्रवार, दिपक गुळवे, नगरसेवक राजू कोमटवार, नगरसेवक रुपेश चिद्रवार, सतिश पिलाजी, निलेश डुबे, गजानन डुबे, मदनमोहनजी खंडेलवाल, पंजाब शिनगारे, संदिपान तोंडे आणि कायाकल्प फाऊंडेशनचे दिनेश कापसे, प्रा.विजय शिनगारे, विश्वानंद तोष्णिवाल, नगरसेवक बालासाहेब चव्हाण तसेच जेष्ठ पत्रकार प्रकाश काळे, सुनिल कावळे, अतुल शिनगारे, नाथा ढगे, सचिन थोरात, पत्रकार तथा युथ क्लबचे माजी अध्यक्ष सुर्यकांत जगताप, पत्रकार रवि गायसमुद्रे यांच्यासह  अनेक मान्यवर व अशोकनगर परिसरातील नागरिक, महिला उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!