पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते कोविड – १९ विषाणू चाचणी प्रयोगशाळेचे लोकार्पण

जिल्ह्यातील पहिली थ्रोट स्वॅब तपासणी प्रयोगशाळा

बीड दि.०७(प्रतिनिधी) राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे हस्ते स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे बीड जिल्ह्यातील पहिल्या कोरोना विषाणू चाचणी (covid-19) साठी थ्रोट स्वॅब तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण आज दि.८ सोमवार रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले.

कोरोना विषाणू संसर्गाचा पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर (सोशल डिस्टंन्सींग) पालन करुन सदर कार्यक्रम साधेपणाने करण्यात आला. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळालेल्या अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड – १९ विषाणू चाचणी प्रयोगशाळेस आवश्यक सामग्री तसेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेची मान्यता मिळाली असून प्रत्यक्ष चाचणीला सुरुवात होत आहे. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आ. संजय दौंड, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. बीड जिल्ह्यातील पहिल्या कोरोना विषाणू चाचणी(covid-19) साठी थ्रोट स्वॅब तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण कार्यक्रम झाल्यामुळे आता अहवालांची प्रतिक्षा संपून तात्काळ रिपोर्ट उपलब्ध होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!