माझं गाव

धारुर बस स्थानकाचं प्रश्न परिवहन मंत्र्यांच्या दालनात; बनले समस्यांचे केंद्र.

किल्लेधारूर दि.22 अॉगस्ट – येथील बस स्थानक (Bus Stand) सध्या अनेक समस्यांमुळे चर्चेचा विषय ठरत असून यातच जीर्ण झालेल्या या बस स्थानकाचे नवीन बांधकाम करण्याची मागणी धारुर (Dharur) नगर परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) गटनेत्या उज्वला सुधीर शिनगारे यांनी परिवहन व संसदीय कार्य मंत्री अनिल परब (Anil Parab) व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

(Question of Dharur bus stand in the hall of Transport Minister; Became the center of problems.)

शहरातील मध्यवर्ती बसस्थानक समस्यांचे माहेर घर बनले आहे. या बसस्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी कुठल्याही सोयी उपलब्ध नाहीत. स्वच्छतागृह, शौचालय, पिण्याचे पाणी आदीसह बैठक व्यवस्था डबघाईला आलेली आहे. ऐन बसस्थानकाच्या आवारातही डांबरी अथवा काँक्रीटचे काम नसल्याने अक्षरशः खड्डे पडलेले आहेत. याच खड्ड्यात मुरुम भरल्यानंतर बसस्थानक चर्चेत आले.

दरम्यान, येथील नगर परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या उज्वला सुधीर शिनगारे यांनी आ.प्रकाशदादा सोळंके (Prakash Solanke) यांच्यासह परिवहन व संसदीय कार्य मंत्री अनिल परब व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन दिले आहे. निवेदनात बसस्थानकाची इमारत 40 वर्षापूर्वी बांधण्यात आल्याचा उल्लेख करत येथे सुविधांचा अभाव असल्याचे नमुद करण्यात आले आहे. निवेदनात नगर परिषदेने नाममात्र दरात परिवहन महामंडळास भाडेतत्वावर दिल्याचे सांगितले आहे. अनेक दिवसांपासून नगर परिषद व परिवहन विभागात असलेल्या जागेच्या वादातून बसस्थानकाचा विकास ठप्प असल्याचा उल्लेख निवेदनात आहे.

सदरील बसस्थानक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून याभागात व्यापारी संकुल उभारणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. नगर परिषद व राज्य परिवहन (State Transport) विभागाच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करुन धारुर बसस्थानकाच्या इमारतीचा प्रश्न निकाली काढत नवीन बसस्थानक इमारत करावी व शहराच्या वैभवात भर टाकावी अशी मागणी केली आहे. निवेदनाच्या प्रती राज्याचे परिवहन व संसदीय कार्य मंत्री अनिल परब व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!