वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांची मांस विक्री; बन्सारोळा येथे एका वर गुन्हा

किल्लेधारूर दि.१३(वार्ताहर) धारुर वनपरिक्षेत्रात दि.१२ रोजी गुप्त माहिती मिळाली मौजे बनसारोळा तालुका केज येथील पारधी वस्तीवर हरणाची शिकार करून मांस विक्री करत असल्याचे खबरी वरून वनविभागाने कारवाई करत मुद्देमाल हस्तगत करत एका वर गुन्हा नोंद केला.

विभागीय वन अधिकारी एम.बी. तेलंग, वनपरिक्षेत्राधिकारी एम.एस.मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एम एम कांबळे वनपाल धारूर, वनरक्षक एल.जी. वरवंटे, कांबळे मॅडम, वनरक्षक संभाजी पारवे व पोलीस शेख युसुफ वडगाव एपीआय डोळे जमादार यांच्या सह सदर ठिकाणी पारधी वस्तीवर जाऊन धाड मारली असता पथकाला पाहताच काही लोक पळून गेले. त्यांच्या घराची झडती घेतली असता त्याठिकाणी मटन, लाकडी ठोकळा, एक टोपले, तराजू, एक सुरा, लोखंडी संतूर जाळे, वाघर मिळून आले ते यांच्यासमक्ष जप्त करून ताब्यात घेतले. सदरील प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलमान्वये गुन्हा नोंदविला. आरोपी अनिल देविदास काळे रा. बनसारोळा फरार आहे. आरोपी विरुद्ध वरील कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे. वन्यप्राण्यांची विशेषतः हरीण, मोर, ससे यांची शिकार करुन मांस विक्री करण्याचे प्रकार वाढले असून सदरील कारवाईमुळे वन्यप्रेमीकडून वन विभागाचे अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!