कोरोंना विशेष

भारतात ऑक्टोबरपर्यंत कोरोनाची तिसरी लाट; रॉयटर्सचे सर्वेक्षण.

नवी दिल्ली दि.20 जून – देशात कोरोना व्हायरसचा (Corona Virus) गेल्या वर्षभरापासून कहर सुरु आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी बाधितांची संख्या कमी-जास्त होत असल्याचे दिसुन येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून थोडा दिलासा मिळाल्यानंतर आता तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या रॉयटर्सच्या सर्वेक्षणानुसार (Reuters survey) भारतात ऑक्टोबरपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे.

(Third wave of corona in India by October; Reuters survey.)

रॉयटर्सच्या या सर्वेक्षणानुसार (Reuters survey) नागरिकांना किमान एक वर्ष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या सर्वेक्षणात जगभरातील 40 आरोग्य तज्ज्ञ, डॉक्टर, वैज्ञानिक, विषाणूशास्त्रज्ञ, साथीच्या रोगाचे शास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांचा समावेश होता. त्यांच्याकडून 3 ते 17 जून दरम्यान कोरोना व्हायरस (Corona virus) संदर्भात अभिप्राय घेण्यात आला.

या सर्वेक्षणानुसार, 85 टक्क्यांहून अधिक म्हणजे 24 पैकी 21 जणांनी असे सांगितले की, ऑक्टोबरपर्यंत तिसरी लाट देशात येणार आहे. त्यापैकी 3 जणांनी ऑगस्टच्या सुरूवातीस आणि 12 जणांनी सप्टेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट (Third wave of corona) येण्याचा अंदाज वर्तविला. उर्वरित तिघांनी नोव्हेंबर आणि फेब्रुवारी दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येईल असे सांगितले.

यासह 70 टक्क्यांहून अधिक तज्ज्ञ म्हणजेच 34 पैकी 24 जणांनी असे सांगितले की, कोरोनाची तिसरी लाट (Third wave of corona) ही कोरोनाच्या दुसर्‍यापेक्षा चांगल्या प्रकारे हाताळली जाऊ शकते. सध्या देशात असणारी कोरोनाची लाट अधिक प्राणघातक ठरली. त्यामुळे या काळात आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आल्याचे देखील समोर आले.

तिसरी लाट येईपर्यंत बर्‍याच लोकांना कोरोनाची लस दिलेली असेल. तर लहान मुलांसह 18 वर्षांखालील मुलांवर संभाव्य तिसऱ्या कोरोना लाटेसंदर्भात तज्ज्ञांची मतं वेगवेगळी आहे. 40 पैकी 26 तज्ज्ञांनी असे सांगितले की, तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर सर्वाधिक परिणाम होईल. तर यातील 14 जणांनी याउलट परिस्थिती असल्याचे सांगत मुलांना धोका नसल्याचे मत व्यक्त केले.

परिस्थिती नियंत्रणात असेल – डॉ. गुलेरिया
यासह दुसरीकडे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबद्दल असे सांगितले, येणाऱ्या नवीन तिसऱ्या लाटेवर सध्या असलेल्या परिस्थितीपेक्षा आणखी नियंत्रण असेल. येत्या सहा ते आठ आठवड्यात तिसरी लाट येण्याची शक्यताही (AIIMS) चे संचालक डॉ. गुलेरिया यांनी व्यक्त केली.

लॉकडाऊनचा पर्याय नको.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत संपुर्ण लॉकडाऊनचा पर्याय हाताळला जावू नये. त्या ऐवजी ज्या ठिकाणी रुग्ण संख्या जास्त आहे तेथे कंटेनमेंट झोन करुन तितकाच भाग बंद ठेवण्यावर विचार केला जावा असे मत डॉ. गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!