विविध विभागातील कर्मचारी व पत्रकारांना अर्सेनिक अल्बम औषधाचे वाटप.

किल्लेधारुर दि.२२(वार्ताहर)येथील ग्रामीण रुग्णालयातील आयुष विभाग व बीड येथील सुषमा क्लिनिकचे डॉ.सचिन वारे यांच्या संयुक्त विद्यमाने कोव्हिड-१९ प्रतिबंधात्मक विशेष शिबीर दि.२२ शुक्रवार रोजी घेण्यात आले. या शिबीरात कोरोना विरुद्ध लढ्यात सहभागी असलेल्या किल्लेधारुर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी, पोलिस कर्मचारी, नगर परिषद कर्मचारी तसेच पत्रकार यांना त्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढावी या उद्देशाने अर्सेनिक अल्बम या होमिओपॕथिक औषधाचे वाटप करण्यात आले.

कोरोणा विषाणूने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. या विषाणूने आता बीड जिल्ह्यातही शिरकाव केलेला आहे. जिल्ह्यात तीसच्या जवळपास कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या विषाणू विरुद्ध विविध विभागातील कर्मचारी तसेच पत्रकार सहभागी होऊन लढा देत आहेत. या सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे कोव्हिड-१९ या आजारापासून संरक्षण व्हावे या उद्देशाने भारत सरकारच्या आयुष विभागाच्या सूचने नूसार किल्लेधारुर ग्रामीण रुग्णालय व बीड येथील सुषमा क्लिनिकचे डॉ.सचिन वारे यांच्या संयुक्त विद्यमाने येथील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी दि.२२ कोव्हिड-१९ विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स व कर्मचारी, नगर परिषद कर्मचारी, पोलिस कर्मचारी व पत्रकार बांधव यांना ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.चेतन आदमाने, आयुष विभाग प्रमुख डॉ.परवेज शेख, तालुका आरोग्य अधिकारी सचिन शेकडे यांनी त्यांची तपासणी करुन रोग प्रतिकारक शक्ती वाढावी या उद्देशाने अर्सेनिक अल्बम या होमिओपॕथिक औषधाचे वाटप करण्यात आले. यावेळी महालॕबचे शेख इरफान, प्रेमानंद स्वामी, राहुल वाडेकर, शेख नासेर, डी.व्ही.तिवारी, सी.आय.सोनवणे, ठोंबरे, आरोग्य सहाय्यक नारायण पौळ यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!