विहिरीत आढळला मृतदेह…


वडवणी दि.१९(प्रतिनिधी) वडवणी तालुक्यातील उपळी येथील शेतकरी श्रीकिसन परळकर यांचा विहिरीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली असून मृतदेहाचे पाय बांधलेल्या अवस्थेत असल्यामुळे हा प्रकार घातपाताचा असु शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. रात्री उशिरा प्रेत शवविच्छेदना साठी कुप्पा, ता. वडवणी येथील प्राथमिक  आरोग्य  केंद्रात पाठवण्यात आले असुन आज दि.१९ रविवारी याबाबत शवविच्छेदना नंतर  पोलिस तपासात प्रकरणाची सत्यता समोर येण्याची शक्यता आहे.

दि.१७ रोजी सकाळी ९ वाजेपासून श्रीकिसन परळकर घरातून बाहेर पडले व रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने कुंटुबीयांनी सगळीकडे शोधा शोध घेतला परंतु ते सापडले नाहीत बीड- परळी राज्य मार्गजवळ त्यांची शेती असुन या रस्त्यावर त्यांची दुचाकी उभी असल्याची आढळून आली. परंतु ते कुठेच सापडले नसल्याने व विहिरीजवळ पायांच्या खुणा दिसुन आल्याने सदरील विहिरीत शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये यश आले नाही.  दि. १८ जुलै रोजी पुन्हा विहिरीकडे जाऊन पाहीतले असता विहिरीत मृतदेह आढळून आला. वडवणी पोलीसांना याविषयी माहिती दिली असता वडवणी पोलीस स्टेशनचे जमादार ढाकणे हे घटनास्थळी येऊन गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला असता सदरील मृतदेहाचे पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. अत्यंत शांत व मितभाषी असलेले श्रीकिशन परळकर यांनी नेमकी आत्महत्या केली की हत्या याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. परळकर यांच्या मृत्यूची बातमी कळताच हळहळ व्यक्त केली जात आहे. रात्री वडवणी पोलीसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कुप्पा पाठविला. मृत्यू नेमका कशामुळे झाला हे उत्तरीय तपासणी नंतरच कळेल असे पोलिसांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!