व्हाट्सअपच्या माध्यमातून तक्रारी स्विकारण्याचा आमदारांचा अनोखा फंडा

जनतेतून स्वागत

किल्लेधारूर दि.१४(वार्ताहर) माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी शेतकरी व सामान्य जनतेच्या तक्रारी थेट व्हाट्सअपच्या माध्यमातून स्विकारण्याचा नवीन फंडा अंमलात आणला असून मतदारसंघातून याचे स्वागत होत आहे व चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सध्या खरीप हंगाम सुरु आहे. याकाळात शेतकऱ्यांची तलाठी अथवा मंडळ अधिकाऱ्याकडे फेरफार किंवा तत्सम महत्त्वाची कागदपत्रे व प्रकरणे प्रलंबित असतात. याशिवाय खरीप हंगाम २०२० मध्ये कर्ज माफीत आलेल्या अथवा कर्ज मिळवण्याबाबत बँकेच्या अडचणी अशा विषयात थेट मदत करण्याचा प्रयत्न आ.प्रकाशदादा सोळंके यांच्या कडून होत आहे. यासाठी त्यांनी थेट व्हाट्सअप या समाज माध्यमाचा वापर करण्याचा अनोखा फंडा सुरु केला आहे. अशा शेतकरी व सामान्य तक्रारकर्त्यांना व्हाट्सअप क्रमांकावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकाराचे स्वागत होत असून दिलेल्या व्हाट्सअप क्रमांकावर तक्रारी प्राप्त होण्यास सुरुवात झाली असल्याचे आ.सोळंके यांचे स्विय सहाय्यक नाना नाटकर यांनी सांगितले. तलाठी व मंडळ अधिकाऱ्याच्या तक्रारीसाठी नाना नाटकर -९४२३१७१६७६ व सय्यद वसीम-९९७०७५७४६० हे व्हाट्सअप क्रमांक आहेत. तर कर्ज प्रकरणी व बँक तक्रारीसाठी सहाय्यक निबंधक, शिवाजी घुले, माजलगाव ९४२०३८५४००, सहाय्यक निबंधक धारुर नेहरकर-९४२१६५८७६७ व वडवणीचे सहाय्यक निबंधक माने ९९२२९५७३०१ यांचे व्हाट्सअप क्रमांकासह स्विय सहाय्यक महादेव सोळंके -९०११११२०५७ व नाना नाटकर-९४२३१७१६७६ यांचे क्रमांक देण्यात आली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!