विधान परिषद निवडणूकीत मविआची बाजी; असे आहेत निकाल…

मुंबईः– महाराष्ट्रात झालेल्या सहा विधान परिषदेच्या निवडणूकीत भाजपाचा (BJP) सपशेल पराभव झाल्याचे दिसत असून सहा पैकी तब्बल चार जागा महाविकास आघाडी कडे एक जागा अपक्षाकडे तर एका जागेवर भाजपाचा (BJP) उमेदवार विजयी झाला आहे. यातील काही निकाल घोषित होणे बाकी असुन मराठवाडा पदवीधर (Aurangabad graduate constituency) मधून मविआच्या सतीश चव्हाण (NCP Satish Chavan) यांनी मोठा विजय मिळवला आहे.
विधान परिषद निवडणूकीत मोठा विजय मिळवण्याचा भाजपाचा (BJP) दावा फोल ठरला आहे. सहाही जागेंचे निकाल घोषित होत असून यात पुणे पदवीधर मतदारसंघात (Pune graduate constituency) महाविकास आघाडीचे श्री.अरुण लाड (राष्ट्रवादी NCP), नागपुर पदवीधर (Nagpur graduate constituency) मधून महाविकास आघाडीचे डॉ.अभिजित वंजारी (काँग्रेस Congress), पुणे शिक्षक मतदारसंघात (Pune Teacher constituency) महाविकास आघाडीचे श्री.जयंत आसगांवकर (काँग्रेस congress), अमरावती शिक्षक मतदारसंघात (Amrawati Teacher constituency) श्री.किरण सरनाईक (अपक्ष) विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. भाजपाचा मात्र सर्वत्र दारुण पराभव होत असल्याचे दिसत असून काँग्रेस मधून भाजपात गेलेल्या अमरीश पटेल यानी धूळे नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात विजय मिळवत भाजपाचे नाव राखले आहे. एकंदरीत एकुण ६ जागा पैकी महाविकास आघाडी ४, अपक्ष-१ तर भाजप १ असे चित्र विधान परिषद निकालांचे आहे.