शहरात अकरा किराणा दुकानदार देणार घरपोच साहित्य
गर्दी रोकण्यासाठी सुहास हजारेंचा प्रयत्न

किल्लेधारूर दि.१६ (वार्ताहर ) धारूर शहरात कोरोना लाॕकडाऊन काळात सुरक्षितता पाळण्यासाठी व रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी अकरा किराणा दुकानदार शहरात घरपोच साहीत्य पुरवण्यास पुढे आले आहेत. यांचे नियोजनासाठी मुख्याधीकारी सुहास हजारे यांनी शहरातील किराणा व्यवसायीकाची आज दि.१६ गुरुवार रोजी बैठक घेऊन योग्य त्या सुचना दिल्या.
कोरोना चा प्रादूर्भाव रोकण्या साठी प्रशासन विवीध उपाय करत आहे. वेगवेगळे गंभिर निर्णय घेत आहेत. नगरपालीकेचे मुख्याधीकारी सुहास हजारे यांनी शहरातील सर्व किराणा व्यवसायीकांची बैठक व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोकराव जाधव यांचे उपस्थीतीत घेतली. या बैठकीत शहरातील रस्त्यावरील व संचारबंदी शिथीलता काळातील गर्दी रोकण्यासाठी दैनंदिन जीवनात लागणाऱ्या जिवनावश्यक किराणा माल घरपोच करणारी योजना शहरात अखण्यात आली. या बाबतच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. अकरा किराणा व्यवसायीक घरपोच माल करण्यासाठी तयार झाले असून नागरीकांनी सहकार्य करावे व या व्यवसायीका कडून घरपोचमाल मागवावा असे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली.