कोरोंना विशेष

समाधानकारक… आरटीपीसिआर ऐवजी ॲन्टीजन वर भर

किल्लेधारूर दि.७(वार्ताहर) आज शहरात पॉझिटीव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या शुन्य असून काल एक जनाचा पाठवलेला स्वॅब अहवाल निगेटिव्ह आला आहे तर ॲन्टीजन तपासणीत आज बाहेरहून २ तर शहरातील कालचा एक असे ३ रुग्ण पोर्टल वर नोंद झालीली आहे. आज ६५ जनांच्या ॲन्टीजन तपासणी केली असून सर्व निगेटिव्ह आली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी दिली. आरटीपिसिआर तपासणीवर नियंत्रण आल्यामुळे पॉझिटीव्ह संख्या कमी झाली की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आरोग्य विभागाच्या नवीन निर्देशानुसार लक्षणे नसणाऱ्या व्यक्तीच्या ॲन्टीजन तपासणी करण्यावर भर देण्यात आला आहे. ॲन्टीजन चाचणीत काल १ तर आज २ जन पॉझिटीव्ह आढळून आली आहेत. काल येथील कोविड सेंटर मधून शहरातील केवळ एक स्वॅब नमुना पाठवण्यात आला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह आला आहे. आज आढळून आलेल्या ॲन्टीजन चाचणीत भोगलवाडी येथील एक तर चोरांबा येथील एकाचा समावेश आहे. यातील एक अंबाजोगाई तर एक माजलगाव येथील ॲन्टीजन तपासणीत पॉझिटीव्ह आला तर काल धारुर शहरातील एक ॲन्टीजन मध्ये पॉझिटीव्ह आलेला मिळून ३ जनांची पोर्टलवर नोंद झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी दिली. गेल्या काही दिवसात आरोग्य प्रशासनाला मिळालेल्या नवीन सुचनांनुसार आरटिपिसिआर तपासणी केवळ लक्षणे असणाऱ्या रुग्णांचीच घ्यायची असल्याने ॲन्टीजन तपासणी वर भर आहे. मात्र ॲन्टीजन तपासणीत संख्या अगदी कमी झाल्याने नागरिकांतून शंका उपस्थित केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!