साध्या पध्दतीने अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

किल्लेधारूर दि.३१(वार्ताहर) तालुक्यात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घरीच राहून साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली.
आज दि.३१ मे रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती सर्वत्र साजरी होत आहे. प्रतिवर्षी जयंती उत्सव विविध कार्यक्रम घेवून मिरवणूक काढून साजरी होते. यंदा मात्र कोरोना संकटामुळे जयंती प्रशासनाचे नियम पाळत घरातच साजरी करण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष माधवराव निर्मळ यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जयंती घरात साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली. यावेळी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करुन कोरोनाला हरविण्याचा प्रण केला.