सावधान परिसरात कोरोनाची इंट्री; नागरिकांत दहशत

धारुर तालुक्यात १०४९ जन होम क्वारांटाईन

किल्लेधारूर दि.१६(वार्ताहर) धारुर पासुन अवघ्या तीस किमी अंतरावर कोरोनाची इंट्री झाल्याने लोकांत दहशत पसरली आहे. सध्या तालुक्यात १०४९ जनांना होम क्वारांटाईन करण्यात आलेले असून यात शहरातील १७६ जनांचा समावेश आहे. कळंब येथे सापडलेल्या रुग्णांना प्रवासाचा इतिहास असल्याने लोकांत भितीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या दोन महिन्यापासुन कोरोनाशी सामना करणाऱ्या नागरीकांत आत्ता भितीचे वातावरण पसरले आहे. धारुर पासुन अवघ्या ३० किमी असलेल्या कळंब मध्ये कोरोनाचे रुग्ण सापडल्याने लोकांत दहशत पसरली आहे. अलिकडे परंडा, जिंतूर व कळंब सारख्या शहरात कोरोनाचे रुग्ण सापडली आहेत. यासर्व रुग्णांना पुणे, मुंबई व औरंगाबाद प्रवासाचा इतिहास आहे. या शहरातुन मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालेले असून धारुर शहरातही गेल्या आठवडाभरात अनेक लोक दाखल झालेली आहेत. याबाबतीत आरोग्य विभागाची संपर्क साधला असता तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन शेकडे यांनी तालुक्यात ग्रामीण भागात दि.१ मे नंतर ८७३ लोकांना तर डॉ. चेतन आदमाने यांच्या माहिती प्रमाणे शहरात १७६ लोकांना अशा एकुण १०४९ लोकांना २८ दिवसांसाठी होम क्वारांटाईन करण्यात आले आहे. प्रवासाचा इतिहास असणारी रुग्ण आढळत असल्याने प्रवास करुन येणाऱ्या ड्रायव्हरलाही यापुढे क्वारांटाईन व्हावे लागणार असल्याचे प्रशासनाने जाहिर केले आहे. जवळपास झालेली कोरोनाची इंट्री ही पुणे, मुंबई व औरंगाबाद मधून झाल्याने आपल्या भागातही सतर्क राहून घरात रहा, संपर्क व सहवास टाळा, गर्दी टाळा, कामाशिवाय बाहेर पडू नका व प्रशासनाचे नियम पाळा असे आवाहन केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!