कोरोंना विशेष

कोरोना बाधिताचा ५३ लोकांशी आला संपर्क

प्रत्यक्ष जवळच्या संपर्कातील ३० नातलग

किल्लेधारूर दि.२९(वार्ताहर) आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सदरील कोरोना बाधिताचा ५३ लोकांशी संपर्क आला असून यात जवळचा प्रत्यक्ष संपर्क आलेल्या मध्ये जवळच्या ३० नातलगाचा समावेश आहे. शहरातील नागरीकांनी सतर्कता बाळगत घरातच राहण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी केले आहे.

काल पासून कोरोना बाधित रुग्णाचा संपर्काचा आवाका किती हे पाहण्याचे काम आरोग्य अधिकारी करत होते. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. चेतन अदमाने, डॉ. मारुती लगड, डॉ. शेख परवेज यांच्या मदतीने सुरु होते. संपूर्ण माहिती गोळा केल्यानंतर सदरील रुग्णाच्या ३० नातलगांचा अत्यंत जवळचा संपर्क आल्याचे निष्पन्न झाले. तर इतर दुरुन असलेल्या संपर्कात २३ जनांचा समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली. शहरातील जनतेने विशेष करुन बाहेरहून येणाऱ्या नातलगांची माहिती प्रशासनास अथवा प्रभाग सुरक्षा समितीस देवून सतर्कता दाखवावे व घरात राहून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!