शैक्षणिक
सेवानिवृत्त आदर्श शिक्षक संभाजीराव जगताप यांचे निधन

किल्लेधारूर दि.३ (वार्ताहर) सेवानिवृत्त आदर्श शिक्षक संभाजीराव रंगनाथ जगताप (७३) वर्ष यांचे वृध्दापकाळाने व अल्पशाः आजाराने गुरूवारी दुपारी निधन झाले. त्यांचे पार्थीवावर धारूर येथे काही वेळात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
धारूर शहरात शिक्षण क्षेञातील प्रसिध्द सेवानिवृत्त आदर्श शिक्षक संभाजीराव रंगनाथ जगताप वय (७३) वर्ष यांचे अल्पशाः आजाराने वृध्दापकाळाने गुरूवार दि ३ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांचे पार्थीवावर कसबा विभागातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, सुना नांतवडे असा परीवार आहे. विज मंडळाचे अॉपरेटर नाना जगताप व पञकार सुर्यकांत जगताप यांचे ते वडील होत.