सेवानिवृत्त शिक्षकाचे असेही दानत्व; मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली देणगी
सेवानिवृत्त शिक्षक संभाजी शिनगारे गुरुजी यांची मदत

किल्लेधारूर दि.१४(वार्ताहर) किल्लेधारूर येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षक संभाजी शिनगारे गुरुजी यांच्या स्वतः वाढदिवसाच्या निमित्ताने कोरोनाग्रस्त च्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधीस ७६०० रुपयांची धनादेश तहसीलदार यांच्याकडे देण्यात आला.
देशभरात कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोना विषाणू हा संसर्ग जास्त प्रमाणात वाढू नये यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन दिवसेंदिवस वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. कोरोना वर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने काही दिवसापुर्वी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्याचे आव्हान करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत किल्ले धारूर शहरातील जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त आदर्श शिक्षक संभाजी शिनगारे गुरुजी यांचा आज ७६ वा वाढदिवस. वाढदिवसाचे औचित्य साधत कोरोना विषाणू संसर्ग निवारणासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्याचे ठरवले. आज ७६ वर्षे पूर्ण झाल्यामुळे एक सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक कार्य करण्याचा संकल्प केला. या संकल्पातून कोरोनावर मात करण्यासाठी आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीत किल्ले धारूर तहसिल कार्यालयाच्या तहसिलदार व्हि.एस. शिडोळकर यांच्याकडे ७६०० रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी तहसिल कार्यालयाचे नायब तहसिलदार रामेश्वर स्वामी, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन, जलदुत विजय शिनगारे, पत्रकार तथा कायाकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष दिनेश कापसे, पत्रकार अतुल शिनगारे, ईश्वर खामकर यांची उपस्थिती होती. या सर्वांनी सेवानिवृत्त संभाजी शिनगारे गुरुजी यांनी महाराष्ट्र शासनाकडे कोरोना विषाणू संसर्ग आपत्ती निवारणासाठी निधी देत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.