कोरोंना विशेष
स्वॅब घेतलेला केजच्या तरुणाचा मृत्यू

केजः दि.१४- काल दि.१३ सोमवारी केज उपजिल्हा रुग्णालयात स्वॅब घेतलेल्या तरुणाचा अंबाजोगाई येथे मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे घडली.
केज तालुक्यातील नांदुरघाट येथील तरुण प्रकृती अस्वस्थ असल्याने केज उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला. त्यास कोरोनासदृश्य लक्षणे दिसल्याने आरोग्य प्रशासनाकडून त्याचा स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठवला. मध्यरात्री १२ नंतर त्याची प्रकृती अधिक खालावल्याने त्यास अंबाजोगाई येथील स्वा.रा.ति. रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र पहाटेच्या सुमारास त्याचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या स्वॕब नमुन्याचा आज अहवाल प्राप्त होणार आहे.