कोरोंना विशेष
स्वॅब घेतलेल्या दोघांच्या मृत्यूमुळे खळबळ

बीडः दि.९(प्रतिनिधी) जिल्हा रुग्णालयात स्वॅब घेतलेल्या दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यू झालेल्यांत बीडची एक महिला आणि गेवराईच्या एका पुरुषाचा समावेश असल्याचे समजते. आज पाठवण्यात आलेल्या स्वॅब मध्ये यांच्याही अहवालाची प्रतिक्षा आहे. अहवाल आल्यानंतरच या दोघांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातून आज २५८ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. काही वेळातच हे स्पष्ट होणार आहे.