हुश्श धारुरला दिलासा मात्र जिल्ह्यात उद्रेक;

बीडः दि.५ आगस्ट- काल धारुरहून पाठवलेली ४२ अहवाल निगेटिव्ह तर अंबाजोगाई येथे उपचार घेत असलेल्या धारुरच्या एका रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. धारुरकरांना दिलासा मिळाला असला तरी जिल्ह्यात मात्र कोरोनाचा कहर सुरुच आहे.
शहरात गेल्या चार दिवसात सतत आढळून येणाऱ्या पॉझिटीव्ह रुग्ण संख्येला तुर्त ब्रेक लागला असून काल पाठवलेले सर्व अहवाल निगेटिव्ह आली आहेत. अंबाजोगाई येथे उपचार घेत असलेल्या धारुरच्या उदयनगर भागातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. आजच्या अहवालात बहुतेक पोलिस व डॉक्टर असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. आजही जिल्ह्यात रुग्णांची संख्या मोठी असून परळी, गेवराई व अंबाजोगाईत पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. आज गेवराईत केलेल्या एंटीजन टेस्टमध्ये २८ पॉझिटीव्ह आढळून आली आहेत. जिल्ह्याच्या आजच्या पॉझिटीव्ह रुग्ण संख्येची छाणनी सुरु असून थोड्या वेळात अधिकृत आकडेवारी जाहीर होईल.