४० स्वॅब अहवालाची आज प्रतिक्षा;  

किल्लेधारूर दि.८(वार्ताहर) आज शहरातील बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ४० लोकांचे थ्रोट स्वॅब अहवालाची प्रतिक्षा आहे. गेल्या सात दिवसांत शहरात दररोज पॉझिटीव्ह रुग्ण आढळून येत असल्यामुळे दहशत निर्माण झाली आहे.

गेल्या सात दिवसांत आढळलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमुळे शहरात चांगलीच दहशत दिसत आहे.  प्रशासनाकडून शहरभर लोकांत जागृती करत आरोग्य तपासणी मोहिम सुरु करण्यात आली आहे.  नियम पाळण्याचे आवाहनही केले जात आहे. काल शहरातील बाधितांच्या संपर्कातील ४० लोकांचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत. यामध्ये पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती व काही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या स्वॅबचा अहवाल आज प्राप्त होणार आहेत. या अहवालाकडे सर्वाच्या नजरा असुन आजही आरोग्य विभागाकडून संपर्कातील लोकांचे उर्वरित २६ स्वॅब पाठविण्यात आली असल्याची माहिती डॉ. शेकडे व डॉ.आदमाने यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!