धारुरमध्ये 104 वर्षाच्या आजींची कोरोनावर मात; आज होणार लसीकरणास सुरुवात.

किल्लेधारूर दि.26 एप्रिल – आडस येथील मथूराबाई आण्णाराव ढोले (104) वर्ष यांना दहा दिवसांच्या उपचारानंतर कोरोना वर यशस्वी मात केल्याने रविवारी दि. 25 एप्रिल रोजी धारूर कोवीड केअर सेंटर (Covid care center) वरून सुट्टी देण्यात आली. दरम्यान, आज सोमवार पासून येथील ग्रामीण रुग्णालयात लसी अभावी बंद पडलेले लसीकरण (Vaccination) सुरु होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. चेतन आदमाने यांनी दिली.

(104-year-old grandmother defeats Kelly Corona; Vaccination will start today.)

आडस येथील ढोले परिवारातील बहूतांशी सदस्य कोरोना पॉजीटीव्ह (Corona Positive) आले होते. धारूर येथील कोविड केअर सेंटर वर त्यांना दाखल करून उपचार करण्यात आले. या कुंटूबातील सर्वांत जेष्ठ सदस्य मथूराबाई आण्णाराव ढोले (वय 104 वर्ष) या कोरोना पॉजीटीव्ह (Corona Positive) आल्या होत्या. धारूर येथील कोवीड सेंटर वर दहा दिवसा पुर्वी त्यांना दाखल करण्यात आले होते.

येथे उपचार करताना या आज्जीनी जिद्दीच्या बळावर उपचाराला चांगला प्रतिसाद दिला. आपल्या कुंटूंबातील सर्व सदस्यांसह रविवारी दि.25 एप्रिल रोजी या आज्जी मथूराबाई ढोले यांनी कोरोना वर मात करून येथील कोवीड केअर सेंटर (Covid care center) वरून त्यांना सुट्टी देण्यात आली. या आज्जीचे सर्वञ कौतूक होत असून या आज्जीना कोवीड सेंटर मधून सुट्टी झाल्यवर कोविड केअर सेंटर बाहेर त्यांचे स्वागत बालासाहेब जाधव, सुरेश जाधव, पत्रकार सुनिल कावळे, सतिश चाळक यांनी केले.

पंधरा दिवसानंतर लस उपलब्ध.
किल्ले धारूर शहरातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध नसल्याने लसीकरण (Vaccination) खोळंबले होते. 300 लस कोविशिल्ड लस उपलब्ध झाल्या असून आज दि.26 सोमवार पासून लसीकरण सुरु होत असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. चेतन आदमाने यांनी दिली. याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

ग्रामीण रुग्णालयात आजपर्यंत 4190 जणांना लस देण्यात आली आहे. यात कोविशिल्डचा (Covishield) पहिला डोस 2143 तर दुसरा डोस 1166 जणांना तर कोवैक्सिन (Covaxin) लसीचा पहिला डोस 701 तर दुसरा डोस 180 जणांना देण्यात आला आहे. एकुण 4190.जणांवर लसीकरण झाले असून सध्या 300 कोविशिल्ड लसी उपलब्ध झाल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!