बीड जिल्ह्यात आज 1150; अंबाजोगाईला दिलासा, धारुर 69 तर केज 103, पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.15 मे – बीड (Beed) जिल्ह्यातील 4447 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 1150 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3297 जण निगेटिव्ह आली आहेत.
(1150 today in Beed district; Dilasa to Ambajogai, Dharur 69 and Kaij 103, see taluka wise statistics.)
आज बीड तालुक्यात 279 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आज अंबाजोगाई तालुक्यात 80, आष्टी तालुक्यात 194 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 69 तर केजमध्ये 121 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-279, अंबाजोगाई-80, आष्टी-194, धारुर-69, गेवराई-97, केज-103, माजलगाव-100, परळी-38, पाटोदा-67, शिरुर-92, वडवणी-31 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या बाराशेवर स्थिर आहे. जिल्ह्यात सध्या लसीकरण खोळंबले आहे. आज पुन्हा मध्यरात्री पासून दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे.
दरम्यान, देशात कोरोनाचा रुग्णांची संख्या सातत्याने 3.5 लाखांच्या आतबाहेर नोंदवली जात आहे. गेल्या आठवड्यात ही संख्या 4 लाखांच्याही वर नोंदवण्यात आली होती. त्यानंतर मात्र या आठवड्यात 4 लाखांचा आकडा भारतात ओलांडला गेलेला नाही. कधी 3.5 लाखांच्या वर तर कधी 3.5 लाखांच्या खाली नव्या रुग्णांची नोंद होतेय.
गेल्या 24 तासांत 3 लाख 26 हजार 332 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालीय. तर शुक्रवारच्या दिवसांत 3 हजार 883 जणांचा कोरोनानं बळी घेतलाय. गुरुवारी 3 लाख 43 हजार 122 रुग्णांची नोंद झाली होती, तर 3994 जणांचा मृत्यु झाला होता. बुधवारपासून सलग तीन दिवस नवे रुग्ण आणि मृत्यू यांची संख्या कमी होत असल्याचं चित्र आहे.