खड्ड्यात पडून दहावीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू; माजलगावमधील दुर्दैवी घटना.

माजलगाव दि.23 मे – माजलगाव तालुक्यातील सादोळा येथील उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे केसापुरी येथील हनुमान मंदिराच्या बाजूला पाईपलाईन च्या कामामुळे खड्डा खंदण्यात आला होता. यात पाणी साठल्याने त्यात पडून एक दहावीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
माजलगाव शहरापासून जवळ असलेल्या केसापुरी कॅम्प येथील हनुमान मंदिराजवळ उपसा जलसिंचन योजना चे काम सुरू आहे. लिकेज झाल्याने त्याठिकाणी खड्डा खंदण्यात आला होता. यात दस्तगीर बिलाल शेख या पंधरा वर्षीय मुलाचा पाय घसरला.
खड्ड्यातील साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडून आली. दरम्यान, या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत असून पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणाचा बळी गेल्याचे बोलले जात आहे. गेल्याच महिन्यात माजलगाव शहरात प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका आठ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
( 10th grade student dies after falling into pit The unfortunate incident in Majalgaon. )