अंबाजोगाईत आज 11 मृत्यू; बीड जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्लान्ट उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करा- धनंजय मुंडे

बीड दि. 21 एप्रिल – बीड जिल्ह्यासह राज्यभरात वाढलेल्या कोरोना रुग्णासंख्येमुळे सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे, यावर उपाय म्हणून जिल्ह्यात सहा रुग्णालयातच हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्लांट (Oxygen production plant) उभारण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान आज जिल्ह्यातील 904 कोरोना बाधितांना सुट्टी देण्यात आली असुन अंबाजोगाई येथे आज 11 जणांचा मृत्यू झाला असल्याचे आरोग्य विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.

(11 deaths in Ambajogai today; Submit a proposal for setting up an oxygen generation plant in Beed district – Dhananjay Munde)

जिल्ह्यातील बीड, परळी, आष्टी, माजलगाव, गेवराई आणि केज येथील रुग्णालयातील ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन त्याठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्लांट (Oxygen production plant) उभा करण्यासाठी आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे, बीडचे आ. संदीप क्षीरसागर, माजलगावचे आ. प्रकाशदादा सोळंके, माजी आ. अमरसिंह पंडित, पृथ्वीराज साठे, रा.कॉ.चे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे आदींनी ना. धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी केली होती.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात परळी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पातील ऑक्सिजन प्लांट धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पुढाकारातून शिफ्ट करण्याचे काम सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी, प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प स्थापन करण्यात यावेत, यासाठी आवशयक खरेदी व अन्य प्रक्रिया तातडीने राबवावी, असे निर्देश देत, याचे अधिकार संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचे स्पष्ट केले होते.

त्यानुसार बीड, परळी, आष्टी, माजलगाव, गेवराई आणि केज या सहा तालुक्यात ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याबाबतची चाचपणी करून त्याबाबतचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे निर्देश धनंजय मुंडे यांनी दिल्यानंतर जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे.

आज नाशिक येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात 6 जणांचा अॉक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. मात्र, स्वाराती रुग्णालय प्रशासनाने सदरील आरोपांचे खंडण केले असुन रुग्णालयात मुबलक स्वरुपात आवश्यकतेनुसार अॉक्सिजन उपलब्ध असल्याचा खुलासा केला आहे. रुग्णालय प्रशासनाकडून आज अंबाजोगाईत 11 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.

बहुतांश मयत रुग्णांची वय हि 60 वर्षावरील असल्याचे रुग्णालयाने सांगितले. काही रुग्णांचा मृत्यू हा भरती करताना अॉक्सिजनचे प्रमाण कमी असल्याचे दिसुन येते. तसेच त्यांना दमा, उच्च रक्तदाब, हायपरटेंशन इत्यादी शारिरीक व्याधी असल्याचे दिसुन आलेले आहे. असा खुलासा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात आज 1047 नवीन बाधित आढळली असुन 904 जणांनी कोरोनावर मात दिली आहे. या लोकांना सुट्टी देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!