बीड जिल्ह्यात आज 1195; पहा तालुकानिहाय कोरोनांक.

बीड दि.24 एप्रिल- बीड (Beed) जिल्ह्यातील 4398 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 1195 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3203 जण निगेटिव्ह आली आहेत. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग कमी करण्यासाठी आज रात्री पासून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
(1195 in Beed district today; See taluka wise coronal number.)
आज आठ्ठेचाळिसाव्या दिवशी बीड तालुक्यात 208 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आज सर्वाधिक अंबाजोगाई तालुक्यात 194, आष्टी तालुक्यात 201 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 50 तर केजमध्ये 130 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-208, अंबाजोगाई-194, आष्टी-201, धारुर-50, गेवराई-124, केज-130, माजलगाव-59, परळी-72, पाटोदा-65, शिरुर-58, वडवणी-34 अशी आहे.
कोविड-19 (covid-19) चा उद्रेक जिल्ह्यातच नव्हे अख्ख्या महाराष्ट्रात वाढलेला आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या दररोज हजारावर येत आहे. राज्य सरकारने बुधवारी रात्री पासून नवीन निर्बंध जाहिर केले असून 1 मे पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यात मृत्यूने कहर केला असून गेल्या वर्षभरातील उच्चांकी नोंद काल झाली आहे. शुक्रवारी 772 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूचा दर 1.52 % इतका आहे. राज्यात 24 तासात 66,836 नवीन रुग्णांची नोंद झाली. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 41,61,676 झाली आहे.