चुलत भावाचा खून; किरकोळ भांडणाचा राग अनावर.

वसमत दि.3 जुलै – नेहमीच्या किरकोळ भांडणाचा राग अनावर झाल्याने लाकडाने जबर मारहाण करून चुलत भावाचा (cousin) खून (Murder) केल्याची घटना वसमत तालुक्यातील वापटी येथे 2 जुलैच्या रात्री घडली.
(Murder of cousin; Annoyance over minor quarrels.)
वसमत तालुक्यातील वापटी येथील मयत विकास बाबुराव शिंदे (वय 50) यांच्यासोबत चुलत भाऊ अमोल शिंदे याचा नेहमी कोणत्या तरी कारणाने वाद व्हायचा. तसेच मयत हा नेहमी आरोपीची पत्नी व आईसाेबत सतत भांडण करून त्रास देत होता. हा प्रकार नित्याचा झाल्याने त्यातून अनेकवेळा आपापसात मारहाण देखील झाली आहे.
दरम्यान 2 जुलै रोजी विकास शिंदे हा त्यांच्या आई, वडिलाच्या घरून जेवण करून झोपण्यासाठी स्वतःच्या घरी आला. यानंतर आरोपीसाेबत रात्री 8.30 वाजता जाेराचे भांडण झाले. तसेच नेहमीचे भांडण होऊ लागल्याने राग अनावर झालेला हाेता. यामुळे दाेघात भांडण हाेत आराेपीने विकासच्या शरीरावर जागोजागी बेदम मारहाण केल्याने ताे मरण पावला.
खुनाच्या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. मयत हा शेती करीत असून, त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आहे. ते अनेक वर्षांपासून माहेरी असल्याने मयत हा गावातील पाण्याच्या टाकी जवळच्या घरात एकटा राहत होता.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस (Police) अधिकारी वखरे, सहाय्यक पोलिस निरिक्षक सुनिल गोपीनवार, पोलिस उपनिरिक्षक सविता बोधनकर, पोना गजानन भोपे यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. फिर्यादी एकनाथ शिंदे यांच्या तक्रारीवरून कुरुंदा पोलीस (Police) ठाण्यात आरोपी अमोल हरिभाऊ शिंदे याच्या विरूद्ध खुनाचा (Murder) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.