कोरोंना विशेष

धारुरमध्ये आज आढळले १३ पॉझिटीव्ह…. पहा किती व कुठले आहेत रुग्ण….

किल्लेधारूर दि.१(वार्ताहर) धारुर तालुक्यातील आजच्या तपासणीत कोरोना (Corona) बाधितांची संख्या १३ आहे. काल पाठवलेल्या १४ स्वॅब (swab) पैकी ६ पॉझिटीव्ह आली आहेत. तर ४४ ॲन्टीजन तपासणीत ७ जन पॉझिटीव्ह आढळली आहेत.

गेल्या काही दिवसात कमी झालेली पॉझिटीव्ह संख्या गेल्या दोन दिवसात वाढली आहे. काल ११ नंतर आज १३ पॉझिटीव्ह रुग्ण आढळली आहेत. यात वडवणी तालुक्यातील एक तर माजलगाव तालुक्यातील तिघांचा समावेश आहे. ४४ ॲन्टीजन (Anigen) तपासणीत ७ जन कोविड (Covid-19) पॉझिटीव्ह आढळून आली आहेत. तर काल पाठवलेल्या १४ स्वॅब (swab) नमुन्यापैकी ६ पॉझिटीव्ह आली आहेत. आज आढळून आलेल्या रुग्णांत शहरातील ४ व माजलगाव, वडवणी व अंबाजोगाई येथील पाच व धारुर तालुक्यातील ५ जनांचा समावेश आहे.

ॲन्टीजन (Anigen) चाचणीतील कोरोना (Corona) पॉझिटीव्ह

१. ५० वर्षीय पुरुष, पहाडी पारगाव, ता.धारुर

२. २४ वर्षीय पुरुष, अंबाजोगाई

३. ४७ वर्षीय पुरुष, पाटील गल्ली, ता.धारुर

४. ३७ वर्षीय स्त्री, तेलगाव, ता.धारुर

५. ४५ वर्षीय स्त्री, पहाडी पारगाव, ता.धारुर

६. ४५ वर्षीय पुरुष, चोरांबा, ता.धारुर

७. ३५ वर्षीय स्त्री, आडस रोड,धारुर

स्वॅब (swab) नमुन्यातील पॉझिटीव्ह

८. ५६ वर्षीय पुरुष, डुकडेगाव, ता.वडवणी

९. ४० वर्षीय स्त्री, सुल्तानपुर, ता.माजलगाव

१०. २० वर्षीय स्त्री, सुल्तानपुर, ता.माजलगाव

११. ८ वर्षीय मुलगी, सुल्तानपुर,ता.माजलगाव

१२. १४ वर्षीय मुलगी, गायकवाड गल्ली, धारुर

१३. ६० वर्षीय पुरुष, कसबा, धारुर

यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!