बीड जिल्ह्यातील आज 1437; केज 195 तर धारुर 85, पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.6 मे – बीड (Beed) जिल्ह्यातील 4454 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 1437 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3017 जण निगेटिव्ह आली आहेत.

(1437 today in Beed district; Kaij 195 and Dharur 85, see taluka wise statistics.)

आज बाव्वनव्या दिवशी बीड तालुक्यात 345 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आज अंबाजोगाई तालुक्यात 242, आष्टी तालुक्यात 84 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 85 तर केजमध्ये 216 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-345, अंबाजोगाई-242, आष्टी-84, धारुर-85, गेवराई-107, केज-195, माजलगाव-58, परळी-58, पाटोदा-126, शिरुर-90, वडवणी-47 अशी आहे.

कोविड-19 (covid-19) च्या विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक शिगेला पोहोचत आहे. देशात दररोज रुग्ण संख्या वाढत आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या गेल्या काही दिवसात दिड हजाराच्या पुढे सरकली आहे. जिल्ह्यात मोकार फिरणाऱ्यासाठी आता केज, बीड व अंबाजोगाई नंतर धारुर शहरातही ॲन्टीजन चाचणी करण्यात येत आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 57 हजार 640 कोरोना बाधित (Corona Positive) रूग्ण आढळले असून, तब्बल 57 हजार 006 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मृत पावणाऱ्यांच्या संख्येत मात्र मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं, काल 920 रूग्णांचा राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!