मराठवाड्यात 24 तासात 144 मृत्यू; बीड 20 तर लातूर 25 … औरंगाबाद जिल्ह्यात बरे होणारे अधिक.

औरंगाबाद दि.26 एप्रिल – मराठवाड्यात (Marathwada) रविवारी दि.25 रोजी दिवसभरात 6 हजार 999 कोरोना बाधितांची (Corona Positive) भर पडली. मराठवाड्यात 24 तासात 144 मृत्यूची नोंद झाली असून यात औरंगाबाद व नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 27 तर लातूर जिल्ह्यात 25 व बीड जिल्ह्यात 20 कोरोना मृत्यूची (Corona death) नोंद झाली आहे. मात्र रविवार औरंगाबादकरांसाठी समाधानकारक ठरला असून रविवारी नवीन रुग्णांच्या आकड्यापेक्षा बरे होणाऱ्यांचा आकडा अधिक होता.
(144 deaths in 24 hours in Marathwada; Beed 20 and Latur 25 … more cures in Aurangabad district.)
रविवारी आलेली मराठवाड्यातील जिल्हानिहाय रुग्णसंख्या पुढील प्रमाणे : लातूर 1522, बीड 1237, नांदेड 1105, औरंगाबाद 1081, जालना 756, परभणी 639, उस्मानाबाद 569, हिंगोली 90 अशी आहे.
मराठवाड्यात (Marathwada) रविवारी उपचारादरम्यान 144 जणांचा कोरोनामुळे मृत्यू (Corona death) झाला आहे. जिल्हानिहाय मृत्यू संख्या पुढील प्रमाणे- औरंगाबाद व नांदेडमध्ये प्रत्येकी 27, लातूर 25, बीड 20, उस्मानाबाद 16, हिंगोली- परभणीत प्रत्येकी 10, जालना 9 जणांचा समावेश आहे.
औरंगाबादमध्ये समाधानकारक चित्र … नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त.
औरंगाबाद जिल्ह्यात 1 हजार 81 नवीन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या 1 लाख 18 हजार 569 झाली. सध्या 13 हजार 615 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या आणखी 1 हजार 693 जणांना सुट्टी देण्यात आली. त्यात महापालिका क्षेत्रातील 951, ग्रामीण भागातील 742 जणांचा समावेश आहे. आतापर्यंत 1 लाख 2 हजार 581 रुग्ण बरे झाले आहेत.