धारुरचे बंजारा नेते युवराज आडे पॉझिटीव्ह;

किल्लेधारूर दि.२२(वार्ताहर) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व विश्व बंजारा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज आडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी स्वतः भ्रमणध्वनी वरुन बीडन्युज२४ ला माहिती दिली.
येथील अंजनडोह तांड्यावरील मुळ निवासी असलेले व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले युवराज आडे यांचे काल दि.२१ रोजी थ्रोट स्वॅब पुणे महापालिकेच्या वतीने घेण्यात आले होते. त्यांचे अहवाल आज आले असुन यात ते पॉझिटीव्ह आढळले आहेत. आडे यांची प्रकृती सामान्य असुन चिंता करण्यासारखे नसल्याचे त्यांनी सांगितले. आडे हे बीड जिल्ह्यात गोर बंजारा समाजात लोकप्रिय आहेत. त्यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्षां कमलताई आडे यांनी युवराज आडे यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती हितचिंतक व कार्यकर्त्यांना केली. त्यांच्या वर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत.