कोरोंना विशेष

ब्रिटेनहून भारतात आलेले २० प्रवासी बाधित…

नवी दिल्लीः दि.२३- परवा आलेल्या विमानात ५ प्रवासी पॉझिटीव्ह आढळल्या नंतर काल दि.२२ डिसेंबर मंगळवार रोजी देशात विविध ठिकाणी पुर्वनियोजित विमान दाखल झाली. यातून आलेल्या प्रवाशांपैकी तब्बल २० प्रवासी करोना पॉझिटिव्ह (Positive) आढळून आलेली आहेत. त्यामुळे या रुग्णांच्या माध्यमातून कोरोनानं (corona) भारतात शिरकाव तर केला नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे. भारत (India) आणि ब्रिटनमधील विमानसेवा बुधवार दि.२३ पासून ३१ डिसेंबपर्यंत बंद राहणार आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या (corona) नव्या प्रकारानं चिंता वाढवली आहे. आधीच्या कोरोनापेक्षा नव्या (Strain) प्रकारचा विषाणू झपाट्यानं पसरत चालला आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाच्या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी ब्रिटनमधून (UK) येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. नियोजित विमान काल दि.२२ डिसेंबर रोजी देशात विविध ठिकाणी दाखल झाली. यातून आलेल्या प्रवाशांपैकी २० प्रवासी करोना पॉझिटिव्ह (Positive) आढळून आलेली आहेत. त्यामुळे या रुग्णांच्या माध्यमातून कोरोनानं भारतात (India) शिरकाव तर केला नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा नवा प्रकार रोखण्यासाठी ब्रिटनमधून (UK) येणाऱ्या प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली असून, त्यामध्ये २० रुग्ण पॉझिटिव्ह (Positive) निघाले आहेत. त्यांना कोरोनाच्या नव्या (Strain) प्रकाराचा संसर्ग झाला आहे की नाही, याची माहिती अजून समोर आलेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!