24 तासात 4 कोरोना बळी… बीड जिल्हा कोरोना अपडेट…

बीड दि.4 फेब्रुवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1675 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल 116 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1559 जण निगेटिव्ह आहेत. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 4 कोरोना बळी नोंदवण्यात आले.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-24, अंबाजोगाई-18, आष्टी-3, धारुर-4, गेवराई-11, केज-10, माजलगाव-8, परळी-31, पाटोदा-2, शिरुर-1, वडवणी-4 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत आठवड्यात मोठ्या प्रमाणात चढ उतार दिसत आहे. कालपेक्षा आज बाधितांचा आकडा कमी झाला आहे. काल 149 रुग्ण होते तर आज 116 बाधित आढळले. आज परळी तालुक्यात सर्वाधिक 31 व बीड तालुक्यात 24 रुग्ण आढळले आहेत. केज तालुक्यात बाधितांची संख्या वाढली आहे.
बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या आज शुक्रवारच्या नोंदीनूसार 149 जण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण संख्या कमी होत असताना थांबलेलं मृत्यू सत्र मात्र सुरु झाल्याचा दिसत आहे. काल गुरुवारी मृत्यू संख्येत 3 ने तर आज 1 नेवाढ होवून जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2858 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 971 झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 6.93 टक्के, रिकव्हरी रेट 96.45 तर डेथ रेट 2.65 आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये १५ हजार २५२ नव्या कोरोना रुग्णांची आणि ७५ मृत्यूची नोंद झाली. तर मुंबईत आज ८२७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालेय. राज्यात सध्या १ लाख ५८ हजार १५१ कोरोना आणि १४०५ ओमायक्रॉन (Omicron) अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ३० हजार २३५ कोरोना रुग्ण बरे झाले.
राज्यात आतापर्यंत आढळलेल्या ३३३४ ओमायक्रॉन बाधित रुग्णांपैकी १९२९ बरे झाले. महाराष्ट्रात झालेल्या ७ कोटी ५० लाख ९९ हजार ६५४ कोरोना चाचण्यांपैकी ७७ लाख ६८ हजार ८०० पॉझिटिव्ह आल्या. राज्यातील रुग्णसंख्येत आज कमालीची घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, राज्यात आढळलेल्या ७७ लाख ६८ हजार ८०० कोरोना रुग्णांपैकी ७४ लाख ६३ हजार ८६८ बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४२ हजार ८५९ मृत्यू झाले तसेच ३९२२ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. राज्यात कोरोना संकटामुळे ९ लाख ५ हजार ६९६ होम क्वारंटाइन तर २६१० संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. महाराष्ट्राचा मृत्यूदर १.८३ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १०.३४ टक्के आणि रिकव्हरी रेट ९६.०७ टक्के आहे. मुंबईतील रुग्णसंख्या देखील तिनशेने कमी झाली.