बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट; पहा तालुकानिहाय बाधितांची आकडेवारी .

बीड दि.20 नोव्हेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 428 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 13 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 415 जण निगेटिव्ह आली आहेत. आज सात तालुक्यात पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. गेल्या तीन दिवसात आढळलेल्या अधिक रुग्ण संख्येमुळे ॲक्टीव रुग्ण वाढले आहेत.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-3, अंबाजोगाई-1, आष्टी-3, धारुर-0, गेवराई-2, केज-1, माजलगाव-1, परळी-0, पाटोदा-2, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या गेल्या तीन दिवसात वाढलेली दिसत आहे. बुधवारी 11, गुरुवारी 17 शुक्रवारी 13 व आज पुन्हा 13 रुग्ण आढळून आली आहेत. काल 769 संशयितांच्या अहवालात 13 तर आज 428 अहवालात 13 कोरोना बाधित (Corona Positive) आढळले आहेत. आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार शुक्रवारी 9 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एका जून्या मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूची एकुण संख्या 2819 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 74 आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात शुक्रवारी 906 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 918 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत घट होत असून सध्याच्या घडीला 11,704 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 66 लाख 28 हजार 744 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 72 हजार 881 रूग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.64 टक्के झाला आहे.