आठ वर्षीय बालिकेवरील अत्याचाराने बीड जिल्हा हादरला; अंबाजोगाई तालुक्यातील घटना.

अंबाजोगाई दि.21 मार्च – क्राईम रेट (Crime Rate) वाढलेल्या बीड (Beed) जिल्ह्यात आणखी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. काल दि.20 रोजी एका आठ वर्षीय बालिकेवर अंबाजोगाई (Ambajogai) तालुक्यात अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेने बीड जिल्हा हादरला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनूसार अंबाजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा येथे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 8 वर्षीय चिमुकलीवर शनिवार दि.19 मार्च रोजी दुपारी 3 च्या दरम्यान घरासमोर खेळत असताना घरात बोलावून नराधम आरोपी किरण राजाभाऊ शेरेकर (वय 23) याने बळजबरीने तोंड दाबून बलात्कार (Rape) केला.
एवढेच नाही तर यानंतर त्या निष्पाप चिमुकलीला भयभीत करत हत्या करण्याच्या धमक्या देवुन बाल मनावरही मोठा घात केला. याप्रकरणी चुलत्याच्या फिर्यादीवरून (Complaint) आरोपी किरण राजाभाऊ शेरेकर (वय 23) वर्षे रा.डोंगरपिंपळा ता . अंबाजोगाई याच्या विरोधात कलम 376, 376(2), 376(अब) 504, 4, 6 पोस्को (POCSO) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी (Police) आरोपीस रात्री उशीरा अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. गेल्या काही दिवसांत बीड जिल्ह्यात वाढलेली गुन्हेगारी पोलिसांची डोकेदुखी वाढवत आहे. सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा प्रश्न चर्चेत आला असून बीड जिल्हा पोलिस अधिक्षकांना गृह विभागाने सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.
( Beed district shaken by rape of eight-year-old girl; Incidents in Ambajogai taluka. )