3 युवकांना अज्ञात वाहनाने चिरडले; पहाटेची घटना.

नांदेड दि.18 जून – नांदेड हैद्राबाद रस्त्यावर धनेगाव चौकात अज्ञात वाहनाने मोटारसायकल वरुन जाणाऱ्या तीन युवकांना चिरडल्याची घटना घडली असून यात तिन्ही युवकांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलिसांनी (Police) पंचनामा केला.
(3 youths crushed by unknown vehicle; Morning event.)

अज्ञात वाहनाने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत तीन युवक ठार झाले. नांदेड (Nanded) जिल्ह्यात ही घटना घडली. धनेगाव चौकात पहाटेच्या सुमारास हा अपघात घटला. मयतात लंकेश गवाले, सतीश देवकांबळे, विनोद दर्शने या युवकांचा समावेश आहे.

20 ये 21 वयोगटातील हे तरुण मित्र लोहा तालुक्यातील राहिवाशी असल्याचे कळते. एकाच मोटारसायकल वरून हे तिघे नांदेड (Nanded) कडे येत होते. नांदेड हैद्राबाद रस्त्यावर त्यांच्या अपघात (Accident) झाला. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस (Police) तपास सुरू आहे.

दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस रस्ते अपघातात मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. लॉकडाऊन काळात बंद असलेली वाहतूक सुरु झाल्यानंतर अपघातात (Accident) मोठी वाढ झाली. गेल्या काही दिवसात मराठवाड्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा वाढला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!