धारुरमध्ये आज 32 रुग्ण; शहरातील दुसरा भाग सिल; पहा शहराची सद्यस्थिती.

किल्लेधारूर दि.13 एप्रिल – बीड जिल्ह्यात कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात आता रुग्ण संख्या मोठ्या संख्येत आढळून येत असल्यामुळे चिंता वाढली आहे. दिवसेंदिवस मृतांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सोमवारी धारुर शहरात 32 कोरोना बाधितांची भर पडली आहे. तर 5 पेक्षा जास्त संख्या आढळल्याने शहरातील कटघरपुरा भागातील एक गल्ली कंटेनमेंट झोन (Containment zone) म्हणून सिल करण्यात आली आहे.
(32 patients in Dharur today; Seal the second part of the city; See the current state of the city.)
गेल्या दहा दिवसांत धारुर तालुक्यात 169 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. यात शहरात आढळून येणाऱ्या बाधितांची संख्या अधिक आहे. तर तालुक्यातील मोहखेड गावातही कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव दिसत आहे. सध्या तालुक्यात कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्ग वाढून 5 पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या शहरातील चार गल्ल्या व तालुक्यातील पाच गावे हॉटस्पॉट ठरत आहेत. 169 मध्ये आज आणखी 32 जणांची भर पडणार आहे.
दि.12 सोमवारी धारुर तालुक्याच्या कोरोना बाधितांत 32 ने वाढ झाली आहे. यात येथील कोविड केअर सेंटर (Covid care center) येथे करण्यात आलेल्या 30 ॲन्टीजन तपासणीत 14 बाधित (Corona Positive) आढळले. रविवारी पाठवण्यात आलेल्या 16 आरटीपिसीआर नमुन्यात 8 पॉझिटीव्ह आढळली. तर भोगलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र कोविड तपासणी केंद्रात 2 व मोहखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात 8 बाधित आढळली आहेत.
धारुर येथील कोविड केअर सेंटरमध्ये (Covid care center) सध्या सर्व बेड पुर्ण क्षमतेने भरली आहेत. प्रशासनाने वाढीव व्यवस्था केली आहे. येथील कोविड केअर सेंटरमध्ये 105 कोरोना बाधित उपचारासाठी दाखल आहेत. यात आज सकाळी आणखी नवीन 10 बाधितांची भर झाली असून आज दि.13 मंगळवारची दाखल रुग्णांची संख्या 115 झाली आहे. 23 बाधितांना उपचारासाठी इतरत्र हलवण्यात आलेले आहे तर 23 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. 19 सौम्य लक्षणे असणारे बाधित गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत.
धारुर शहरातील कटघरपुरा, लक्ष्मी नगर, वीर पांडूरंग चौक व हनुमान चौक या गल्ल्यांत बाधितांची संख्या वाढली आहे. तर तालुक्यातील मोहिखेड, कारी, कोळपिंपरी, रुईधारुर व अंबेवडगाव या गावांतही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. प्रशासनाच्या नवीन आदेशाप्रमाणे स्थानिक प्रशासनाने 5 किंवा त्यापेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळून येणाऱ्या भागाला कंटेनमेंट झोन (Containment zone) घोषित करुन तो भाग सिल करण्यात येत आहे. वीर पांडूरंग चौकानंतर सोमवारी कटघरपुरा भागात एक गल्ली सिल करण्यात आली आहे.