हवामान

Meteorological Department बीडसह या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज.

54 / 100

मुंबई दि.21 जून – Meteorological Department बीडसह राज्यात अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने Indian Meteorological Department वर्तवला आहे. तसेच मराठवाडा व विदर्भात 22 ते 23 जूननंतर पावसाला सुरुवात होण्याची दाट शक्यताही वर्तवली आहे. Meteorological Department Rain with lightning in this district including Beed; Weather forecast.

अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा Cyclone Biperjoy परिणाम यंदाच्या मान्सूनवर झाल्यामुळे राज्यात मान्सून Monsoon सक्रीय झालेला नाही. अशातच मान्सूनचा पाऊस नेमका कधी पडणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शेतकरी, नागरिक उकाड्याने हैराण झालेले आहेत. मात्र, आता पुढील 5 दिवसांमध्ये राज्यातील हवामान बदलणार असून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बीडसह Beed नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, नांदेड, जालना, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे Indian Meteorological Department प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 5 दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. तसेच विदर्भात दोन दिवस हवामान कोरडे असेल आणि उष्णतेचा तडाखा बसेल अशी शक्यता आहे. याशिवाय विदर्भातील गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मात्र आज तीव्र उष्णतेच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागतील. या ठिकाणी आज हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, दोन दिवसांनंतर मात्र विदर्भ आणि मराठवाड्यातही पाऊस हजेरी लावेल, असे के. एस. होसाळीकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मराठवाडा व विदर्भात 22 ते 23 जूननंतर पावसाला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे 25 जूननंतर सर्वत्र चांगल्या पावसाला शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!