शुक्रवारीही बीड जिल्ह्यात 383; बीड, अंबाजोगाई, केज, धारुर व पाटोदा येथे वाढ.

बीड दि.2 एप्राल- बीड जिल्ह्यात लॉकडाऊन नंतरही कोरोनाचा उद्रेक थांबता थांबेना. आज बीड (Beed) जिल्ह्यातील 2679 प्राप्त अहवाला पैकी 383 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून 2296 जण निगेटिव्ह आली आहेत. आज सत्ताविसाव्या दिवशी बीड तालुक्यात आज तब्बल 108 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळली आहेत. धारुर 16 तर केजमध्ये 38 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले.

(383 in Beed district on Friday; Increased at Beed, Ambajogai, Kaij, Dharur and Patoda.)

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-108, अंबाजोगाई-84, आष्टी-39, धारुर-16, गेवराई-13, केज-38, माजलगाव-19, परळी-18, पाटोदा-29, शिरुर-10, वडवणी-9
अशी आहे.

कोविड-19 (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.2 शुक्रवारी दुपारी जाहिर केली. बीड जिल्ह्यात आजची रुग्ण संख्या 393 वरुन वाढत 383 झाली आहे. बीड जिल्ह्यात लॉकडाऊन असतानाही कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने जाहिर केलेल्या 10 दिवसांच्या लॉकडाऊनचा आज आठवा दिवस आहे.

दरम्यान, गुरुवारी राज्यात कोरोनाचा कहर पहायला मिळाला. 43 हजार पेक्षा जास्त नवे कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण राज्यात आढळून आली. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे राज्यावर लॉकडाऊनचे सावट आहे. आज मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!