मध्यप्रदेश मधील ३९ जनांना तर कांगोमध्ये ६० जनांना जलसमाधी….

नवी दिल्ली/सतनाः– सकाळी मध्यप्रदेश मध्ये ५४ प्रवासी घेवून जात असलेली बस कालव्यात पडली. या अपघातातील ७ प्रवासी पोहत पाण्या बाहेर आले होते. बसमधील ३९ जनांचे मृतदेह सापडले आहेत तर बेपत्ता लोकांचा शोध सुरु आहे. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो (Democratic Republic of Congo) मध्ये सोमवारी रात्री ७०० प्रवाशांनी भरलेली जहाज कांगो (Congo) नदीत पलटल्याची घटना घडली असून या घटनेत ६० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जहाजातून प्रवास करणाऱ्या ७०० प्रवाशांपैकी ३०० लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. तर, इतर प्रवासी बेपत्ता असल्याची माहिती आहे.

जहाजातून क्षमेतेपेक्षा जास्त व्यक्ती प्रवास करत असल्यामुळे दुर्घटना घडल्याचं समोर आले आहे. ही घटना माई-नोमडबे प्रांतातमध्ये घडली. ते जहाज रविवारी रात्री किनहासा प्रांतातून मबनडाका येथे जाण्यासाठी रवाना झाली होती. माई-नोमडबे प्रांतातील लोंगगोला इकोती गावाजवळ जहाज पोहोचल्यानंतर दुर्घटना घडली. मंत्री स्टीव मबिकायी यांनी दिलेल्या माहितीनुसार क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास करणे हे आहे. याशिवाय जहाजामध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजनाचं साहित्य देखील भरलं गेलं होतं. मबिकायी यांनी या घटनेत जीव गमावलेल्यांना आदरांजली व्यक्त केली आहे. तर, या घटनेत जीव गमावलेल्या परिवाराच्या सदस्यांप्रती सहवेदना व्यक्क केल्या आहेत. या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मध्यप्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील सीधी जिल्ह्यात एक भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ५४ प्रवाशांनी भरलेली बस रस्त्यावरून घसरून थेट बाणसागर सरोवराच्या कालव्यात कोसळली. या भीषण अपघातात (Accident) आत्तापर्यंत ३९ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून काही वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर ७ जणांना जिवंत वाचवण्यात यश आले आहे. सुरुवातीला बसचा शोध घेताना अडथळे येत असल्याने बाणसागर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग रोखण्यात आला. दुपारपर्यंत ३९ जनांचे मृतदेह काढण्यात बचाव पथकाला यश आले. पाण्याच्या वेगामुळे इतर प्रवासी वाहुन गेले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मध्यप्रदेश चे (Madhya Pradesh) मुख्यमंत्री शिवराज सिंग सातत्याने घटनेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून घेत आहेत. अपघातातील (Accident) मयतांच्या कुटूंबियांचे सांत्वन करत मदत जाहिर केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!