धारुरमध्ये आज 41 नवीन रुग्ण; वाढीव कोविड सेंटरही झाले फुल.

किल्लेधारूर दि.16 एप्रिल – महाराष्ट्रात कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बीड जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात आता रुग्ण संख्या मोठ्या संख्येत आढळून येत असल्यामुळे चिंता वाढली आहे. दिवसेंदिवस मृतांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गुरुवारी धारुर शहरात 41 नवीन कोरोना बाधितांची भर पडली आहे.
(41 new patients in Dharur today; The increased covid center also became full.)
गेल्या आठवड्यापासून धारुर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण आढळून येत आहेत. सुरुवातीला शहरात आढळून येणाऱ्या बाधितांची संख्या अधिक होती. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातील अनेक गावात प्रादुर्भाव वाढला आहे. तालुक्यातील मोहखेड, आवरगाव, आसरडोह, कोळपिंपरी, गावात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव दिसत आहे. सध्या तालुक्यात कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्ग वाढून 5 पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या शहरातील चार गल्ल्या व तालुक्यातील पाच गावे हॉटस्पॉट ठरत आहेत.
आज मिळालेल्या माहितीनूसार तालुक्यात नवीन 41 कोरोना बाधित (Corona Positive) आढळले आहेत. धारुर कोविड केअर सेंटर येथे गुरुवारी 52 ॲन्टीजन तपासणी करण्यात आल्या. यात 17 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर बुधवारी पाठवण्यात आलेल्या 101 आरटीपिसिआर नमुन्यातील 15 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तालुक्यातील भोगलवाडी केंद्रात एक व मोहिखेड केंद्रात आठ असे नवीन 41 कोरोना बाधितांची भर पडली आहे. सध्या येथील कोविड केअर सेंटरमध्ये 121 बाधित उपचार घेत आहेत.
धारुर येथील कोविड केअर सेंटरमध्ये (Covid care center) सध्या सर्व बेड पुर्ण क्षमतेने भरली आहेत. प्रशासनाने वाढीव व्यवस्था केली आहे. पहिल्या इमारतीत 80 व नवीन इमारतीत 41 जणांची सोय करण्यात आली आहे. येथील कोविड केअर सेंटरमध्ये (Covid care center) एकुण 121 कोरोना बाधित उपचारासाठी दाखल आहेत. यात आज आणखी बाधितांची भर पडणार असल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. अपुरा कर्मचारी वर्ग असल्यामुळे अतिरिक्त कामाचा ताण आरोग्य कर्मचाऱ्यांवर येत आहे. असून दि.15 गुरुवारी दाखल रुग्णांची संख्या 121 झाली आहे. काल 5 बाधितांना उपचारासाठी इतरत्र हलवण्यात आलेले आहे तर 20 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. सौम्य लक्षणे असणारे काही बाधित गृह विलगीकरणात ठेवण्यात आलेले आहेत.
धारुर शहरातील कटघरपुरा, लक्ष्मी नगर, वीर पांडूरंग चौक व हनुमान गल्ली या गल्ल्यांत बाधितांची संख्या वाढली आहे. तर तालुक्यातील मोहिखेड, कारी, कोळपिंपरी, रुईधारुर, अंबेवडगाव, आवरगाव, आसरडोह या गावांतही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. प्रशासनाच्या नवीन आदेशाप्रमाणे स्थानिक प्रशासनाने 5 किंवा त्यापेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळून येणाऱ्या भागाला कंटेनमेंट झोन (Containment zone) घोषित करुन तो भाग सिल करण्यात येत आहे. वीर पांडूरंग चौक, कटघरपुरा भागात कंटेनमेंट झोन (Containment zone) करण्यात आलेले आहे.