त्या रुग्णांच्या संपर्कात आलेले 5 जण पॉझिटिव्ह; जीनोम सिक्वेन्सिंगची प्रतिक्षा.

मुंबई दि.3 डिसेंबर – बंगळुरु महापालिकेने (Bangalore Municipal Corporation) दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकात आलेल्या दोन परदेशी व्यक्तींना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. यापैकी 46 वर्षीय व्यक्तीच्या थेट संपर्कात तिघे जण आले होते. तर या तिघांच्या संपर्कात आणखी दोघे जण आले होते. या पाचही जणांची 22 आणि 25 नोव्हेंबरला कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये पाचही जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
(5 of those patients who came in contact were positive; Waiting for genome sequencing.)
जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने (Omicron) अखेर भारतात शिरकाव केला आहे. कर्नाटकमध्ये (Karnataka) दोन जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं आढळून आले आहे. यापैकी एक रुग्ण नुकताच दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) भारतात परतला आहे, तर दुसरी व्यक्ती आरोग्य कर्मचारी आहे. बेंगळुरू महानगरपालिकेने दोन्ही संक्रमित रुग्णांची संपूर्ण माहिती दिली आहे.
Omicron प्रकाराची लागण झालेली 66 वर्षांची व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतून दुबईमार्गे भारतात परतली असून 20 नोव्हेंबर रोजी विमानतळावरून त्याचे नमुने घेण्यात आले. त्यांनी कोरोना लसीचे (Corona vaccine) दोन्ही डोस घेतले आहेत. बेंगळुरू महानगरपालिकेच्या अहवालानुसार, या व्यक्तीने निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन दक्षिण आफ्रिकेतून भारतात प्रवास केला.
भारतात परतल्यानंतर त्यांची चाचणी केली असता त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळला. यानंतर 22 नोव्हेंबरला त्याचा कोविड नमुना पुन्हा घेण्यात आला आणि तो जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला. मात्र, यादरम्यान या व्यक्तीची खासगी लॅबमध्ये पुन्हा कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता.
ओमिक्रॉन पॉझिटिव्ह दुसऱ्या 46 वर्षीय रुग्णाची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. बंगळुरू महानगरपालिकेच्या अहवालानुसार, त्या व्यक्तीला 21 नोव्हेंबरला ताप आला तसंच अगं दुखू लागलं होतं. त्यानंतर त्याने रुग्णालयात जाऊन त्याची आरटीपीसीआर चाचणी (RTPCR test) केली. चाचणीचा अहवाल आल्यानंतर 22 नोव्हेंबरला तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याचा नमुनाही जीनोम सिक्वेन्सिंगसाठी (genome sequencing) पाठवण्यात आला आहे.
हा रुग्ण 22 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरपर्यंत होम आयसोलेशनमध्ये होता. त्यानंतर 25 नोव्हेंबरला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तीन दिवसांच्या उपचारानंतर 27 नोव्हेंबरला त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं.
संपर्कात आलेले 5 जण पॉझिटिव्ह
अहवालानुसार, 22 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबरपर्यंत त्याच्या संपर्कात आलेले एकूण 5 लोक देखील पॉझिटिव्ह आढळले होते, ज्यांना आता आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या एकूण 218 लोकांवरही नजर ठेवली जात आहे.