भीषण अपघातात ५३ ठार…. बस व टँकरची धडक

बुधवारी घडली घटना

कॅमरून दि.२८:  बुधवारी एका बस आणि टँकरची समोरासमोर टक्कर झाली. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत किमान ५३ जणांचा मृत्यू (Killed) झाला आहे तर २१ लोक जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य आफ्रिकी देश कॅमरूनमध्ये (Cameroon) भीषण रस्ता अपघात (Accident) झाला आहे. इथंदेशाच्या पश्चिम भागात एका खेड्यात हा अपघात झाला आहे.

कॅमरूनच्या (Cameroon) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकायदेशीरपणे इंधन वाहून नेणाऱ्या ट्रकने (fuel tank) बसला (bus) धडक दिल्याने हा अपघात झाला. जोरात धडक झाल्यामुळे इंधनामुळे लगेच आग लागली. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक ठार झाले. जखमींना तात्काळ जवळच्या स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे, ’७० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला (bus) बेकायदेशीरपणे तेल घेऊन जाणाऱ्या ट्रकने (fuel tank) जोरदार धडक दिली. ज्यामध्ये बसमध्ये बसलेल्या बर्‍याच लोकांचा मृत्यू (Killed) झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले’. या अपघातामध्ये २० पेक्षा जास्त लोक आगीत होरपळे असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. दरम्यान, हा अपघात (Accident) नेमका कसा झाला? याचं कारण शोधण्याचं काम पोलीस करत असून घटनास्थळी अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!