पुन्हा भीषण अपघातात 6 ठार; मराठवाड्यात अपघाताची मालिका सुरुच…

औरंगाबाद दि.30 डिसेंबर – काल हिंगोली (Hingoli) येथे झालेल्या अपघातानंतर आज सिल्लोड तालुक्यातील भराडी महामार्गावर भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 14 जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास झाला.
(6 killed in tragic accident again; A series of accidents continues in Marathwada …)
काही दिवसांपुर्वी लातूर (Latur) येथे भीषण अपघात झाला होता. यानंतर काल हिंगोली येथे एक प्रवासी ट्रॅव्हल्स आणि ट्रकची एकमेकांना धडक बसून भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू तर 20 ते 25 जण जखमी झाल्याची घटना घडली होती. यानंतर आज पुन्हा औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात सिल्लोड (Sillod) तालुक्यातील भराडी रोडवर ऊसाचे ट्रॅक्टर रस्त्याचे कडेला नादुरुस्त अवस्थेत उभे होते. यावर छोटा टेम्पो आदळून हा अपघात झाला.
भराडी मार्गावर छोटा पीकअप भरधाव वेगाने जात होता. मात्र, रस्त्याच्या कडेला नादुरुस्त उभ्या असलेल्या ऊसाच्या ट्रॅक्टरला छोटा पीकअपची पहाटे 3 वाजता जोरदार धडक बसली आणि भीषण अपघात झाला. छोटा पीकअप ही प्रवासी गाडी 6 लोकांना घेऊन चालली होती. अपघातात या लोकांचा जागीच मृत्यू झालाय. मृत व्यक्ती या मंगरूळ तालुका सिल्लोड या गावचे आहेत. तर 14 जण जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना सिल्लोड येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मंगरूळ येथील शिवराम मुकुंदा खेळवणे यांचा बुधवारी संध्याकाळी घाटशेंद्रा येथे विवाह होता. वऱ्हाडी पाहुणे लग्न लावून रात्री ही परत मंगरूळ येथे येत होती. झोपेच्या नादात वाहना वरील नियंत्रण सुटून मोढा फाटा, भराडी रोड या ठिकाणी ऊस असलेले ट्रॅक्टर रस्त्याचे कडेला नादुरुस्त अवस्थेत उभा असताना, रात्रीचे 2.00 वाजताचे सुमारास अशोक लेलँड छोटा पीक अप (क्र. MH 20 CT 2981) सदरील टेम्पो ऊसाच्या ट्रॅक्टरला धडकला अशी माहिती मिळत आहे.
दरम्यान, मृतदेह सिल्लोड रुग्णालय येथे नेण्यात आले आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये जिजाबाई गणपत खेळवणे ( 60) संजय संपत खेळवणे (42), संगिता रतन खेळवणे (35) लक्ष्मीबाई अशोक खेळवणे (45), अशोक संपत खेळवणे (52 ) सर्व रा मंगरुळ यांचा समावेश आहे.