धारुरात तीन दिवसात 7 मृत्यू; तर एका दिवसात बीड जिल्ह्यात 13 मृत्यू.

बीड दि.28 एप्रिल – बीड जिल्ह्यात मंगळवारी 13 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर धारुर तालुक्यात तीन दिवसांत 7 कोरोना मृत्यू (Corona Death) नोंदवले गेली आहेत. शहरात 3 तर तालुक्यातील चौघांचा यात समावेश आहे.
(7 deaths in three days in Dharura; 13 deaths in one day in Beed district.)
मंगळवारी बीड जिल्ह्यात 13 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण दगावले. यात अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील 63 वर्षिय महिला, अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा येथील 65 वर्षिय महिला, आपेगाव मधील 70 वर्षिय पुरुष, शहरातील जयभवानीनगर मधील 84 वर्षिय पुरुष, बीड शहरातील आंबीका चौक भागातील 48 वर्षिय महिला, धानोरा रोड भागातील 40 वर्षिय महिला.
याशिवाय धारुर तालुक्यातील काटेवाडी येथील 75 वर्षिय महिला, गेवराई तालुक्यातील गुळस येथील 72 वर्षिय पुरुष, गेवराई शहरातील गणेशनगर भागातील 28 वर्षिय महिला, याच शहरातील 65 वर्षिय पुरुष, पाटोदा तालुक्यातील पिंपळाचीवाडी येथील 65 वर्षिय महिला, मंजेरी येथील 50 वर्षिय पुरुष आणि तांबा राजूरी येथील 73 वर्षिय पुरुष यांचा मृतात समावेश आहे.
तसेच जिल्ह्यातील कोरोना संशयित असलेल्या 4 हजार 397 लाेकांची चाचणी करण्यात आली होती. याचे अहवाल मंगळवारी प्राप्त झाले. यात 3 हजार 100 लोकांचा अहवाल निगेटिव्ह आला तर 1 हजार 297 लोक पॉझिटिव्ह आढळले. यात अंबाजोगाई 206, आष्टी 138, बीड 313, धारुर 52, गेवराई 84, केज 171, माजलगाव 44, परळी 85, पाटोदा 77, शिरुर 82, वडवणीतील 45 रुग्णांचा समावेश आहे.
आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ४९ हजार ६७५ एवढी आहे. पैकी ४३ हजार ३८ कोरोनामुक्त झाले असून ८६५ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्यू दर 1.76 टक्के आहे. आरोग्य विभागाच्यावतीने जिल्ह्यातील माहिती जाहिर करण्यात आली आहे.
धारुर तालुक्यात 37 मृत्यू .
धारुर तालुक्यात एकुण 37 मृत्यू (Corona Death) झाली आहेत. यातील दोघांच्या रहिवासी पत्त्यात केज असा बदल झाल्यामुळे संख्या 35 आहे. कालपर्यंत एकुण मृत्यूची संख्या 33 होती. आज शहरात एक व तालुक्यात एक कोरोना बाधित दगावला आहे. तर तीन दिवसात 7 कोरोना बाधित दगावले आहेत. यात शहरात 3 तर तालुक्यात 4 जणांचा समावेश आहे.