घात अपघात
Accident … धारुर घाटात ट्रक पलटी; दोन जखमी.

किल्लेधारुर दि.16 जुलै – Accident धारुर Dharur शहरानजीक असलेल्या घाटात आज दि.16 रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गोडतेल घेवून जाणारा ट्रक पलटी होवून दोन जण जखमी झाल्याची दुर्घटना घडली. ( Accident … Truck Overturned in Dharur Ghat; Two injured. )
याबाबत मिळालेली माहिती अशी की, धारुर Dharur शहरापासून जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्ग 548 सी वर घाटातील Dharur Ghat एका अवघड वळणावर अपघात Accident घडला. गोडतेलाचे डबे घेवून जाणारा ट्रक ( क्र. एमपी 09 एचएच 1510 ) एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. यात ड्रायव्हर व क्लिनर जखमी झाले असून त्यांना नागरीकांनी तात्काळ धारुर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमीची नावे मात्र अद्याप कळू शकली नाहीत.