धारुरच्या कापसाला मिळणार १२ हजार भाव….. कापसासह सिताफळालाही येणार चांगले दिवस…

किल्लेधारूर दि.१४ (वार्ताहर ) धारूर तालूक्यात मोठ्या प्रमाणात कापुस cotton  व सिताफळाचे custard apple उत्पादन होते. कापुस cotton  व सिताफळासह custard apple शेतकऱ्यांच्या पालेभाज्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजार निर्माण करण्याची संधी येण्याची शक्यता आहे. गट शेतीत नावलौकिक प्राप्त सह्याद्री फार्म्स प्रोंड्युसर Sahyadri चे चेअरमन व पथकाने विविध गावात भेटी देऊन कापूस cotton , सोयाबीन, सिताफळ custard apple उत्पादन वाढवून दुध व्यवसायाची जोड कशी देता येईल या बाबत चर्चा केल्याने शेतकऱ्यांचे अच्छे दिन येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

देशातील कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी सह्याद्री Sahyadri फार्म्स प्रोड्युसर कॉपरेटिव्ह लिमिटेड नासिक चे चेअरमन श्री विलास शिंदे Vilas Shinde यांनी नुकतीच धारुर तालुक्यात भेटी दिल्या. नर्मदा Narmada ग्रुपचे संचालक तसेच तरूण उद्योजक माधवराव निर्मळ Madhav Nirmal यांची धारुर येथे भेट घेऊन कापूस या विषयावर जागतिक बाजारात शेतकऱ्यांना कसा जास्त भाव मिळेल या विषयावर सविस्तर चर्चा केली. याभागात कापुस, सोयाबीन व सिताफळाचे चांगले उत्पादन आहे. मात्र स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना या पिकांना शासन हमीभावा शिवाय चांगला दर मिळत नाही. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या सर्वच मालाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सह्याद्री Sahyadri फार्म्स प्रोड्युसर कॉपरेटिव्ह लिमिटेड नासिक प्रयत्नशील आहे. याभागातील शेतकऱ्यांच्या मालाला जागतिक व्यापारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. नर्मदा Narmada ग्रुपचे प्रमुख माधवराव निर्मळ Madhav Nirmal यांच्या सोबत याबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा करुन कापुस खरेदी विक्रीचा व्यवहार अंतिम टप्प्यात असल्याचे कळाले. यामुळे याभागातील शेतकऱ्यांच्या कापसाला १० ते १२ हजार रुपये दर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सह्याद्री Sahyadri फार्म्सच्या या प्रयत्नांतून या भागातील शेतकऱ्यांचे अच्छे दिन येणार आहेत. यावेळी देवा लोंढे, निळकंठ गडदे व इतर स्टाफ उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!