अल्पवयीन मुलीचे अपहरण; केज तालुक्यातील घटना.

केज दि.20 जानेवारी – केज (Kaij) तालुक्यात एक अल्पवयीन मुलगी (Minor Girl) पाणी आणण्यासाठी गेली. मात्र ती अद्याप घरी न आल्याने अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा (Kidnapping) गुन्हा युसूफ वडगाव पोलिसांत नोंद झाला आहे.

(Abduction of a minor girl; Incidents in Kaij taluka.)

याबाबत मिळालेली माहिती अशी की, रविवार (दि.17) दुपारी 12 च्या सुमारास पाणी आणण्यासाठी जाते म्हणून 16 वर्षीय मुलगी घरा बाहेर पडली. उशीरा पर्यंत ती घरी परत न आल्यामुळे कुटुंबातील व्यक्तींनी तीचा सर्वत्र शोध घेतला. परंतु ती कुठेही आढळून आली नाही.

मुलीच्या भावाने बुधवारी (दि.19) पोलीसांत (Police) फिर्याद दिली. त्यावरून युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक (Police Inspector) डॉ. संदीप दहीफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पिंपळे घटनेचा तपास करीत आहेत.

गेल्या काही दिवसांत केज उपविभागीय पोलिस अधिकारी पंकज कुमावत (Pankaj Kumawat) धडाकेबाज कारवाईने चर्चेत आले आहेत. यामुळे केज उपविभागात क्राईम रेट (Crime rate) कमी होत आहे. परंतू या गंभीर गुन्ह्यामुळे केज तालुका पुन्हा चर्चेत आला आहे. पोलिस लवकरच गुन्हेगाराच्या मुसक्या आवळतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!